Wednesday, November 2, 2022

खूप आनंदी आहे आयुष्य




खूप आनंदी आहे आयुष्य 
भरभरून जगले तर 
सुख दुःखांच्या पार जाऊन 
क्षणाक्षणांनी वेचले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
टवटवीत ठेवले तर 
भरल्या आभाळाकडे पाहून 
ओले चिंब भिजले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
मान अपमान सोडले तर 
रोग शोक बाजूला सारून 
मन सुंदर ठेवले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
सतत शिकत राहिले तर 
अनुभव समृद्धी मिळत राहते 
कामात व्यस्त राहिले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
मनाने ठरविले तर 
चंद्र सूर्याला साक्षी ठेवून 
हसऱ्या डोळ्यांनी पाहिले तर... 

 - आसावरी समीर

just-be-happy


Wednesday, April 20, 2022

जीवन म्हणजे नाटक

 

जीवन म्हणजे नाटक
रंगमंचावर रंगलेले 
सुंदर आभूषणे घालून 
नट नट्यांनी सजलेले 

प्रत्येक जण चढवितो 
मेकअप फसव्या भावनांचा 
उभा राहतो रंगमंचावर 
खेळ चाले क्षणांचा 

उत्कंठा असते प्रत्येकाला 
काय घडेल आता पुढे 
थांबला तो संपला 
हाच नियम नित्य घडे 

सुख-दुःख यश-अपयश 
दिसते नाटकात क्षणोक्षणी 
आहे का हो याला 
अपवाद म्हणतात तो कुणी 

मोहमाया द्वेष असूया 
षड्रिपूंनी भरलेले नाटक 
तोल सांभाळायला असावेच लागते 
सद्गुणांचे छानसे पात्र 

नाटक जगावे समरसून 
संत सज्जन सांगतात बरेच 
एक्झिट होताना 
समाधानाची पावले 
चालत निघावी दाराकडे 

जीवन म्हणजे नाटक 
रंगमंचावर रंगलेले 
हसून सजवावे एवढेच सांगणे 
आनंद नांदावा चोहीकडे.. 

-आसावरी समीर 

Life-is-drama


Monday, April 18, 2022

Be Happy!

 
towards the moon 
into the sky
I met a bird 
flying by… 
roaming happily 
in his ways
Life is good”.
all that he says...
 
towards the forest 
very green
I met a tree
very lean… 
standing tall 
in his ways
Stay strong” 
all that he says...
 
towards the water 
into the ocean
I met a fish 
in motion… 
swimming along 
in his ways
Be happy
all that he says!

Be-Happy


Tuesday, April 5, 2022

जंगल




मैं जंगल हूँ

मेरी हरी भरी पनाह के नीचे

जीते हैं सुकून से

पंछी, पेड, पौधे, जानवर 


ये है मेरे अपने 

वे मानते है मुझे घर 


घर 


जो उनको देता है 

एक प्यारी सी जगह

जो है उनकी अपनी 


आझाद है वे यहां... 


किसी संग्रहालय से

कई बेहतर 

है उनकी जिंदगी 


वह स्वतंत्र है 

मैं उनकी स्वतंत्रता का 

सम्मान रखता हूं 


मैं जंगल हूं

सबको अपने मे समा लेता हूं! 

-आसावरी समीर

 

Jungle


Friday, February 26, 2021

आनंदाचं झाड

प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं

पाना फुलांनी ते कधी बहरतं

कधी शुष्क निष्पर्ण होऊन सुकतं


प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं 

ऊर्जेचं खतपाणी दिलं की 

सुंदर फुलांमधे ते हसतं 

लक्ष न दिल्यास खुंटतं


प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं 

आपणच ठरवायचं

निराशेच्या गर्ततेत त्याला लोटायचं 

की हसऱ्या सुंदर मनाने त्याला फुलवायचं 


प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं 

जे आनंद देत, आनंद घेत उभं असतं

आणि त्याचं उभं असणं हेच सर्व काही असतं 


प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं... 


-आसावरी समीर




Thursday, January 14, 2021

हे सागरा





शांतता अथांगता
तुझीया जगाची 
गूढता

सौम्यता रौद्रता
तुझीया रूपाची 
भिन्नता 

अगम्यता, अलभ्यता
ओढणारी 
आर्तता 

होऊ नी स्वार 
लाटांवरी 
गेयता 
क्षणोक्षणी 

जग तुझे 
भावते 
आबालवृद्ध 
असो कुणी... 

हे सागरा
हे मंदिरा
भाळतो पाहुनी 

नमन

तुज मनोमनी



Thursday, December 3, 2020

प्रश्न - उत्तर


सकाळच्या

कोवळ्या लख्ख 

चमचमत्या सूर्यप्रकाशात 

मी न्हाऊन निघाले.. 

प्रसन्न मनाने हळूच 

सृष्टी कर्त्याला विचारले 

“ का रे असे जग निर्माण केले ?

एकीकडे आहे 

प्रकाशित पायवाट

प्रसन्नतेने नटलेली... 

तर दुसरी कडे आहे 

एकाकी पायवाट

काळोखात बुडालेली...”

हळूच तो हसला…

म्हणाला,

“अगं, पायवाट आहे तीच 

पण ठेवायची काळोखात 

की लख्ख मिणमिणत्या दिव्यांनी 

उजळवायची प्रकाशात 

हे तर आहे 

तुझ्याच हातात...

बघ जमतय का..”

conversation-with-god


Sunday, November 15, 2020

पणती

Light-a-diya

एक पणती 
आली दारी 
चहूकडे 
प्रकाश पसरी

सौम्य शांत 
तेजस्वी ज्योत 
बघता तिज
होई प्रसन्न चित्त 

नमस्कार माझा
ह्या पणतीला
लख्ख उजळो
दिशांचा पसारा

Tuesday, September 29, 2020

तू आहेस


तू आहेस 
अखंड बडबड... 
नि :शब्द करणारी 

तू आहेस
सुंदर चांदणी ...
शुक्रासारखी

तू आहेस
हळूच फुंकर...
दुःखा वरची

तू आहेस 
दाट सावली.. 
माया देणारी 

तू आहेस
सुंदर खळी
गालावरची 

तू आहेस 
निर्मळ मनाची 
सानुली गोजिरी 

तू आहेस 
मुलगी माझी .. 

ओंजळ भरगच्च 
प्रेमाने भरणारी 

Daughter-angel




Saturday, September 26, 2020

अनुभव


अनुभव...

खूप काही
देऊन जातात

कधी हसवतात
कधी रडवतात
तर कधी चिडवतात

काही शिरतात
मनाच्या खोल दरीत
आणि येतात
आपसूक बाहेर
कधीतरी

शेवटी जीवन म्हणजे काय
तर अनुभवांची एक रांग
कधी शिकवणारी
कधी जगविणारी

Experience-Beauty



Tuesday, September 1, 2020

पाऊस सृजनाचा


सृजनाचा
गुलाबी पाऊस
पडतोय सर्वत्र
भिजवतो चिंब
बुडवितो आकंठ

ह्याच पावसात
दिसते आहे
हिरवी दिशा
हिरवी पहाट...
आणि सापडते
सृजनाची
पांढरी स्वच्छ वाट

ह्या वाटेवर
पडतोय
मंद प्रकाश
किंचितसा पिवळा
किंचित लाल
आणि निळ्याशार
पाण्या सोबत
मिसळतोय
सृजनाचा घाट

घाटावरील मंदिर
त्यावरील केशरी
पताका
सोबतीला आहेच
विटकरी रंगावर उभा
माझा काळा विठोबा... 
Being-creative


Tuesday, August 11, 2020

कृष्ण गीत

 

सुंदर मुरली

वाजे मधुर

जीवनात मिसळले

सप्त सुर

मैफिलीत आहे

तुझेच नाव

मुरली मनोहर

राधे श्याम


आनंदाचा

देई छंद

राधा – मोहन

प्रीत मकरंद

कृष्ण कन्हैया

तुझेच नाव

बंधु सखा

अन पालनहार


निर्गुण सगुण

रूप तुझे

मनमोहक

श्याम वर्ण

विराजे

आभाळी ही

तुझेच नाव

सुंदर माधव

मेघ: श्याम

 

नभ भरून येता

दिसतो तूच

थेंबात ह्या

वसतोस तूच

घे माझा

एक प्रणाम

हरी गोविंद

पंचप्राण...

  

Lord-Krishna

 

 

 

 


Saturday, August 8, 2020

माझ्या आयुष्याची नाव

माझ्या आयुष्याची नाव
चालते तरंगत...
कधी संथ
कधी धावत...
पाण्याच्या ओघाने
रस्ता शोधत...

पाण्याची सोबत
आहेच अखंड...
कधी हे पाणी
झुळझुळते...
गोड गाणी म्हणते...
तर कधी
रौद्ररूप धारण करत
नाकी नऊ आणते...

न बुडण्याचा
प्रयत्न करत
नाव हेलकावे खाते...
आणि
सौम्य शीतल प्रवाहात
हळूच शिरताच
गुणगुणते...

"नाविका रे वारा वाही रे
डौलाने हाक जरा आज नाव रे..."
Sail-through-life


Tuesday, July 28, 2020

चिंब ठेवण...

चिंब तुझे मन
चिंब माझे मन
ओल्या काळजाची
चिंब आठवण...

चिंब हवा
चिंब वारा
भिजल्या पापण्यात
चिंब धारा...

चिंब ओठी
चिंब धून
सुक्या ओंजळीत
चिंब ठेवण...

Rainy-days

Saturday, July 25, 2020

सुचणे

सुचतेच काही तरी
लिहायला गेलो तर...
कधी एक ओळ
शहाणी असते...
कधी वेडी
शहाणपणाच्या भरात
वाहावत जाणारी...
वेडेपणात
गटांगळ्या खाणारी... 

सुचायला असतात
शंभर विचार डोक्यात 
कधी उलटे
कधी सुलटे
कधी सरळ...
पानावर येतात
आपसूक तरंगत...

सुचले नाही तर काय?
शांत मिटून
पडून राहावे स्वस्थ
भावना येतात मग
घेऊन दस्तक...

सुचणे होऊन
जातो
शेवटी एक खेळ
विचार आणि भावनांचा
वर्तनातून होतो
कधी व्यक्त
नाहीतर निजलेल्या
चाफ्यात राहतो
अव्यक्त!

Think-feel-act
 

Sunday, July 19, 2020

आला वेळ - गेला वेळ


निसटू नये

सुटू नये

घड्याळाचे गणित

चुकू नये

आला वेळ

गेला वेळ

बघावा काही

ताळमेळ

हाती काही

आले का

सुंदर काही

झाले का

कोणी कोठे

फुलले का

काही छान

जमले का

वेळ जाणे

गेला कसा

कळीचे फूल

झाले तसा!

Beautiful-Time
Image by FunkyFocus from Pixabay 

Wednesday, July 15, 2020

अमिताभला झाला करोना

अमिताभला झाला करोना
चैन उराला पडेना

चॅनेल खूप बदलले
त्याचे हाल हवाल जाणले

नाश्ता त्यांने केला का
जेवण त्याला गेले का

बातमी सगळी इत्थंभूत
चॅनेलवाले पंचमहाभूत

अमिताभचे आम्ही फॅन
त्याला करतो big सलाम

होवो त्याची स्पीडी रिकवरी
चॅनेलवाल्यांची जाईल बेचैनी

'तुम्हारे पास क्या है'
विचारले अमिताभ ला

तर भारतीयांच्या मनातले स्थान
असे तो म्हणाला...

 खरेच आहे त्याचे म्हणणे
उगाच का चॅनेल्स
त्याच्या पाठी लागले...

Amitabh-gets-Corona



Sunday, July 12, 2020

Living the unknown


Living the unknown

The future blinks…

In the next second

what it brings?

LIFE

Life unfolds...

‘Will’ becomes ‘Is’

while dreaming with ‘Will’…

stands the beauty of life…

Power of ‘now’

brings peace as the

Moments are seized

with ‘Is’…

 

 Image by Pexels from Pixabay 

Wednesday, July 8, 2020

उगाचच


चिकित्सा करतो
काही गोष्टींची
उगाचच

त्याच त्या गोष्टी
उगाळत राहतो
उगाचच

नको असताना
खात राहतो
उगाचच

ढीगभर वस्तू
जमा करतो
उगाचच

वाहत राहतो
भावनांच्या प्रवाहात
उगाचच

पण

कधीतरी
भरल्या आभाळी
हसून पहावे
उगाचच

कधीतरी गुणगुणावे
आपलेच गीत
उगाचच

कधीतरी भिजावे
स्वप्नांच्या पावसात
उगाचच

कधीतरी
तू आणि मी
निःशब्द बघावे डोळ्यात
उगाचच...


Wednesday, July 1, 2020

विठ्ठल

 
नाही वारी
नाही पंढरी
विठ्ठल बसला
द्वार लावूनी

उघड विठुराया
द्वार आपुले
मागणे मागतो
काकुळतीने

का रूसलासी
सांग आता
धाव पाव
सत्वरिता

चुकलो आम्ही
तुझी लेकरे
सांभाळूनी घे
आम्हा देवा

आहे तू
भक्तीचा भुकेला
आम्ही भुललो
पांडुरंगा

काळे सुंदर
रूप तुझे
जगी पाहतो
तुझीच रुपे

रुक्मिणी सवे
ये लवकरी
असु दे माया
आम्हावरी

विठ्ठला तू
वेडा कुंभार
मनी प्रेम हे
अपरंपार...

-आसावरी समीर

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...