Showing posts with label laughter-poem. Show all posts
Showing posts with label laughter-poem. Show all posts

Saturday, October 5, 2019

हसणे


मंद स्मित
गौतम बुद्धाचे
करुण हास्य
येशू ख्रिस्ताच्या डोळ्यांचे

लाघवी हसणे
गोड गोंडस बाळाचे
प्रसन्न हास्य
मुरली मनोहर श्रीकृष्णाचे
सलज्ज हसणे
प्रेमी युगुलांचे
हसणे हसवणे
विदूषकाचे
निर्मळ हास्य
मैत्रीतल्या गप्पांचे
जगणे काय असावे
हसणे,
निव्वळ हसणे
दुःखांचे ओझे
हलके करणारे
क्षणा क्षणात
आनंद ओतणारे
अथ पासून इति चा प्रवास
सुखकर करणारे....

Thursday, October 3, 2019

प्लास्टिक नावाचा भस्मासुर


प्लास्टिक नावाचा भस्मासुर
एकदा पृथ्वीवर आला
बघता बघता त्याने
हाहाकार केला

प्राण्यांच्या जीवाचे
झाले हाल
पोटात प्लास्टिकचे
गोळे हजार

शांत समुद्र
पार वैतागला
निळ्याशार पाण्यावर
तवंग साचला

एकही जागा
उरली नाही
जेथे प्लास्टिक चा
शिरकाव नाही

पृथ्वी म्हणाली मानवांनो
जागे व्हा जरा
ह्या भस्मासुराला
नेस्तनाबूद करा
प्रत्येक वस्तू
प्लास्टिक च्या
वेसणात घालू नका
माझा अंत पाहू नका
Reduce Reuse Recycle
ची शपथ घ्या
Single use प्लास्टिक
बंद करा

माझ्या लेकरानो
हा भस्मासुर आहे खरा
कदाचित तिसरे महायुद्ध
आलय तुमच्या दारा...

Monday, July 28, 2014

टुणटुण

टुणटुण गेली बाजारी
तिने घेतली नवारी
नवारीचा बुट्टा छान
टुणटुण दिसते गोरी पान

टुणटुण गेली बाजारी
तिने घेतली ज्वारी
ज्वारीची भाकरी थापली
गुटू  गुटू खाल्ली

टुणटुण गेली बाजारी
तिने घेतली फुलवारी
सुंदर फुले खोवली
लाज लाजरी ती झाली

टुणटुण गेली बाजारी
तिला भेटली सई राणी 
सईला दिली भेट
सई एकदम खुशीत


Thursday, February 13, 2014

माझी मुलगी !

हसरी माझी मुलगी
खिदळ्त राहते
हाहा हीही हाहा हीही

रडकी माझी मुलगी
रडत राहते
क्यांव क्यांव क्यांव क्यांव

शेंबडी माझी मुलगी
शेंबूड काढ्ते
फर फर फर फर

पादरी माझी मुलगी
पादत राहते
पू पू पू पू

बुटकी माझी मुलगी
जंप मारते
हाय हाय हाय हाय

शहाणी माझी मुलगी
अंगण झाडते
झर झर झर झर

गोड माझी मुलगी
सोनुली गोजिरी
लाज लाजरी बाहुली
कुशीत येते पटकन
डोळे तिचे सांगून जातात
काहितरी झटकन ...

Friday, January 31, 2014

बालगीत

पंखा फिरतो गर गर
सई चालते भर भर
मांजर म्हणते म्याऊ म्याऊ
सई तिला देते खाऊ
कुत्रा म्हणतो भु भु  
सई म्हणते छू छू
ढोल वाजतो ढम ढम
सई करते मम्म
पाउस पडतो रपरप
सई खाते गप गप
चिमणी करते च्यू च्यूू
सई च्या डोक्यात झाली ऊ
गाढव म्हणतो ढॅंचू
सई करते शॅंपू
चटकदार लागते भेळ
सई दमते खेळुन खेळ
आई म्हणते अंगाई
सई करते गाई गाई ...

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...