जात पात न मानणारा
होता तो एक
प्रखर मानवतावादी
खऱ्या शिक्षणाची जाण असलेला
आणि प्रखर तेजःपुंजाने
समानतेची ज्योत पेटविणारा
देवाला न मानणार्या त्याला
देवत्व दिले लोकानी
बसविले त्याला देव्हाऱ्यात
गायिली त्याची गाणी
खिसा गलेलठ्ठ भरलेले, सुस्तावलेले
त्याचेच अनुयायी
पराजित करू पहात होते त्याला
त्याच वेळेस
शिक्षणाचा दरवाजा उघडा पाहून
कचरा वेचणारा मुलगा
उच्चविद्याविभूषित होताच
हसला हा महामानव स्वर्गात
हसला हा महामानव स्वर्गात...