नमस्कार!
"मस्त गाऊ छोटी गाणी " हा माझा बडबडगीतांचा संग्रह मी eBook स्वरुपात Amazon Kindle वर प्रकाशित केला आहे.
माझ्या मुलीसाठी 'सई' साठी मी काही गाणी स्वत: रचली. तिचे नाव गाण्यात यावे ही संकल्पना होती. मग खाऊ घालताना, आंघोळ घालताना, झोपवताना मी ही गाणी म्हणु लागले. 'मस्त गाऊ छोटी गाणी' ह्या गाण्यांचा संग्रह आहे. (इतरही काही गाणी ह्यात समाविष्ट आहेत.) आपण आपल्या मुलाचे /मुलीचे नाव गाण्यामध्ये वापरून, आवश्यक बदल करून, ही गाणी म्हणु शकता... गाणी पाठ केल्यास त्याचे अजून काही फायदे होतात .. मुलांना हसवायला, लक्ष वेधून घ्यायला, रडणे थांबवायला ही गाणी उपयोगी ठरू शकतात. आणि छोटी पिल्ले पण गाणी गुणगुणू लागतात...
ह्या eBook मधील चित्रे हा माझा Digital Illustrations काढण्याचा पहिला प्रयत्न होता. मला ही छोटी चित्रे काढताना खूप मजा आली. ही चित्रे इतरांनाही आपलीशी वाटतील अशी अपेक्षा!
आपण हा संग्रह चाळावा आणि छोट्या मुलांसोबत जरूर share करावा. गाण्यांना चाल तुम्ही स्वत: लावू शकता.. पण मला संपर्क साधल्यास मी ऑडिओ फॉर्म मध्ये कविता शेअर करू शकते.
माझी मैत्रीण स्मिता वराडे हिचा अभिप्राय:
सोपी शब्द रचना, गेयता, लहान मुलांच्या आवडीचे विषय, स्वतःचे नाव कवितेत अंतर्भूत करण्याची सोय या वैशिष्ट्यांमुळे लहान मुलांना या कविता खचितच आपल्या वाटतील. आणि आपलं साहित्य आवडणं हेच कवी/लेखकाचे यश असते.
Amazon वरील पुस्तकाची लिंक :
https://www.amazon.in/dp/B088PMD89B
कविता आवडल्यास अभिप्रायाच्या प्रतीक्षेत -
आसावरी समीर
=========================================
* आपण Amazon Kindle हे App डाऊनलोड करून त्यावर eBooks वाचू शकता.