जुनी नाती
जुन्या आठवणी
गत दुनियेत
फिरणे फक्त
जुन्या जखमा
जुने दुःख
आठवण होताच
रडणे फक्त
जुन्या वस्तू
जुना संग्रह
मागे राहतो
मोह फक्त
जुन्या वाटा
जुना ध्यास
नवीन श्वास
हवा फक्त
जुन्या प्रथा
जुन्या कथा
बोध घेणे
व्हावे फक्त
केशवसुत हा
गुरू खरा
पुढल्या हाका
ऐकाव्या फक्त...
-आसा 19/09/2019