आजोबा
मायेची पाखर घालणारा
एक हळुवार झोका ...
निःशब्द प्रेम करणारा
एक लपलेला चेहरा ...
चेहर्यावर राग दाखविला तरी
रागामागचई काळजी लपवू
न शकणारा ...
घराला घरपण देउन्
नातवंडांचा सवंगडी होउन
त्यामधे रमणारा...
करायला व्याख्या खुप
आहेत 'आजोबा'
या व्यक्तिच्या ...
पण ती व्यक्ती
निघून गेल्यावर उरतात्
त्या फक्त व्याख्या ...
आणि गरज भासत
नाही त्या व्याख्यांची
पण भासत रहाते ती उणिव
त्या मायेच्या सावलीची ...