मंद स्मित
गौतम बुद्धाचे
करुण हास्य
येशू ख्रिस्ताच्या डोळ्यांचे
लाघवी हसणे
गोड गोंडस बाळाचे
प्रसन्न हास्य
मुरली मनोहर श्रीकृष्णाचे
सलज्ज हसणे
प्रेमी युगुलांचे
हसणे हसवणे
विदूषकाचे
निर्मळ हास्य
मैत्रीतल्या गप्पांचे
जगणे काय असावे
हसणे,
निव्वळ हसणे
दुःखांचे ओझे
हलके करणारे
क्षणा क्षणात
आनंद ओतणारे
अथ पासून इति चा प्रवास
सुखकर करणारे....