एकच आयुष्य
दिले देवाने
जगण्यासाठी...
एकच आयुष्य
क्षणाक्षणाने,कणाकणाने
नसानसात भिनण्यासाठी
एकच आयुष्य
कितीही प्लान केले
तरी अनप्लान्ड जगलेलं..
एकच आयुष्य
जीवन मृत्यूच्या
दरम्यान अडकलेलं..
एकच आयुष्य
पण किंमत त्याची
कळू नये हे दुर्दैव..
एकच आयुष्य
किंमत कळता
जगण्याचा,सृजनाचा
आनंद देणारं...
एकाच आयुष्यात
पण करावयाच्या आहेत
कितीतरी गोष्टी...
एकच आयुष्य
पुरेल का रे देवा?
की तरीही उरतील
करावयाच्या काही गोष्टी...