Showing posts with label balgeet. Show all posts
Showing posts with label balgeet. Show all posts

Saturday, May 16, 2020

मस्त गाऊ छोटी गाणी


नमस्कार!


"मस्त गाऊ छोटी गाणी " हा माझा बडबडगीतांचा संग्रह मी eBook स्वरुपात Amazon Kindle वर प्रकाशित केला आहे.

माझ्या मुलीसाठी 'सई' साठी मी काही गाणी स्वत: रचली. तिचे नाव गाण्यात यावे ही संकल्पना होती. मग खाऊ घालताना, आंघोळ घालताना, झोपवताना मी ही गाणी म्हणु लागले. 'मस्त गाऊ छोटी गाणी' ह्या गाण्यांचा संग्रह आहे. (इतरही काही गाणी ह्यात समाविष्ट आहेत.) आपण आपल्या मुलाचे /मुलीचे नाव गाण्यामध्ये वापरून, आवश्यक बदल करून, ही गाणी म्हणु शकता... गाणी पाठ केल्यास त्याचे अजून काही फायदे होतात .. मुलांना हसवायला, लक्ष वेधून घ्यायला, रडणे थांबवायला ही गाणी उपयोगी ठरू शकतात. आणि छोटी पिल्ले पण गाणी गुणगुणू लागतात...


ह्या eBook मधील चित्रे हा माझा Digital Illustrations काढण्याचा पहिला प्रयत्न होता. मला ही छोटी चित्रे काढताना खूप मजा आली. ही चित्रे इतरांनाही आपलीशी वाटतील अशी अपेक्षा!




आपण हा संग्रह चाळावा आणि छोट्या मुलांसोबत जरूर share करावा. गाण्यांना चाल तुम्ही स्वत: लावू शकता.. पण मला संपर्क साधल्यास मी ऑडिओ फॉर्म मध्ये कविता शेअर करू शकते.


माझी मैत्रीण स्मिता वराडे हिचा अभिप्राय:
सोपी शब्द रचना, गेयता, लहान मुलांच्या आवडीचे विषय, स्वतःचे नाव कवितेत अंतर्भूत करण्याची सोय या वैशिष्ट्यांमुळे लहान मुलांना या कविता खचितच आपल्या वाटतील. आणि आपलं साहित्य आवडणं हेच कवी/लेखकाचे यश असते.


Amazon वरील पुस्तकाची लिंक :
https://www.amazon.in/dp/B088PMD89B


कविता आवडल्यास अभिप्रायाच्या प्रतीक्षेत -
आसावरी समीर


=========================================
* आपण Amazon Kindle हे App डाऊनलोड करून त्यावर eBooks वाचू शकता.



Wednesday, January 15, 2020

प्राणी


कोल्होबा बिल्होबा
आहेत मोठे शहाणे
द्राक्षांच्या मळ्यात
खात आहेत दाणे

चिमणी बिमणी
गाते आहे गाणी
तिचे गाणे ऐकून
डोळ्यात आले पाणी

ससोबा बिसोबा
टुणटुण धावतात
कासवाला म्हणे
हे मागे टाकतात

माकड बिकड
आहेत मोठे हुशार
त्यांना टोप्या घालणे
कठीण आहे फार

वाघोबा बिघोबा
जंगलाचे राजे
त्यांच्या इशाऱ्यावर
प्रजा नाचे

असे हे प्राणी
त्यांचे जग निराळे
 जगू द्या त्यांना
मनाप्रमाणे...

Tuesday, September 17, 2019

बाळ


चिमणीचं पिल्लू
चिव चिव करतंय
बाळाला आंघोळ
कोण घालतंय

कावळ्याचं पिल्लू
काव काव करतंय
बाळासोबत
कोण खेळतंय

मांजरीचं पिल्लू
म्याव म्याव करतंय
बाळाला खाऊ
कोण घालतंय

आईचं बाळ
क्याव क्याव करतंय
बाळा आमचा
खाऊ खातोय... 

Monday, July 28, 2014

टुणटुण

टुणटुण गेली बाजारी
तिने घेतली नवारी
नवारीचा बुट्टा छान
टुणटुण दिसते गोरी पान

टुणटुण गेली बाजारी
तिने घेतली ज्वारी
ज्वारीची भाकरी थापली
गुटू  गुटू खाल्ली

टुणटुण गेली बाजारी
तिने घेतली फुलवारी
सुंदर फुले खोवली
लाज लाजरी ती झाली

टुणटुण गेली बाजारी
तिला भेटली सई राणी 
सईला दिली भेट
सई एकदम खुशीत


Monday, June 23, 2014

चवी!

इवलीशी चिंच ही
आंबट आहे फार फार
फळांचा राजा हा
गोड आहे फार फार
समुद्राचे पाणी हे
खारट आहे फार फार
चेंडूसारखा आवळा हा
तुरट आहे फार फार
कोल्हापुरी मिरची ही
तिखट आहे फार फार
हिरवीगार कारले हे
कडु आहे फार फार
चल ग सई जेवायला
उशीर झाला फार फार
या चवींच्या असण्याने
जेवण झाले फार छान
त्रुप्त ही ढेकर देता
आनंद वाटे फार फार

Sunday, May 11, 2014

पांडा भाऊ

पांडाभाऊ पांडाभाऊ
काय करता तुम्ही?
सई सोबत खेळता की
झोपा काढता तुम्ही
पांडाभाऊ पांडाभाऊ
काय करता तुम्ही?
सई सोबत खेळता की
बांबू खाता तुम्ही
पांडाभाऊ पांडाभाऊ
काय करता तुम्ही?
सई सोबत खेळता की
पळत रहता तुम्ही
पांडाभाऊ पांडाभाऊ
इकडे या तुम्ही
आता तरी सईसोबत
खेळा जरा तुम्ही

Friday, March 28, 2014

सई

सई आमची छोटिशी
नाजुक आहे फार
इकडे तिकडे इकडे तिकडे
पळे ती फार
सई आमची छोटिशी
सुगरण अहे फार
भातुकलीच्या खेळामध्ये
पुढे पाउले चार
सई आमची छोटीशी
खट्याळ अहे फार
गल्लिमध्ये हिच्या नावाने
बोम्बा बोम्ब फार
सई आमची छोटिशी
हुशार अहे फार
शाळेमध्ये पाढे म्हणे
बे दुणे चार
सई आमची छोटिशी
खेळकर आहे फार
बास्केट बॉल टेबल टेनिस
सगळ्या खेळात हुशार
सई आमची छोटिशी
गोड आहे फार
आइ बाबान्च्या गळ्यातला
जणु काही हार ...
जणु काही हार ...
जणु काही हार ....

Thursday, February 13, 2014

माझी मुलगी !

हसरी माझी मुलगी
खिदळ्त राहते
हाहा हीही हाहा हीही

रडकी माझी मुलगी
रडत राहते
क्यांव क्यांव क्यांव क्यांव

शेंबडी माझी मुलगी
शेंबूड काढ्ते
फर फर फर फर

पादरी माझी मुलगी
पादत राहते
पू पू पू पू

बुटकी माझी मुलगी
जंप मारते
हाय हाय हाय हाय

शहाणी माझी मुलगी
अंगण झाडते
झर झर झर झर

गोड माझी मुलगी
सोनुली गोजिरी
लाज लाजरी बाहुली
कुशीत येते पटकन
डोळे तिचे सांगून जातात
काहितरी झटकन ...

Friday, January 31, 2014

बालगीत

पंखा फिरतो गर गर
सई चालते भर भर
मांजर म्हणते म्याऊ म्याऊ
सई तिला देते खाऊ
कुत्रा म्हणतो भु भु  
सई म्हणते छू छू
ढोल वाजतो ढम ढम
सई करते मम्म
पाउस पडतो रपरप
सई खाते गप गप
चिमणी करते च्यू च्यूू
सई च्या डोक्यात झाली ऊ
गाढव म्हणतो ढॅंचू
सई करते शॅंपू
चटकदार लागते भेळ
सई दमते खेळुन खेळ
आई म्हणते अंगाई
सई करते गाई गाई ...

Thursday, May 24, 2012

बाळाचे सवंगडी


कोण आले रे कोण आले?

छोटू बाळाचे खेळगडी आले

छोटू बाळा खेळतो

खेळ गड्यांसंगे रमतो

खेळगडी हे काय करतात?

आमच्या तान्हुल्याला खेळवितात

चिव चिव चिमणी काय करते? काय करते?

बाळाला गुदगुदल्या करते...

काव काव कावळा काय करतो ? काय करतो?

बाळाशी लपाछपी खेळतो...

मिठू मिठू पोपट काय करतो? काय करतो?

बाळासाठी गाणे गातो..

खारुताई खारुताई काय करते ? काय करते?

बाळासाठी खाऊ आणते..

आमची हम्मा काय करते ? काय करते?

बाळासाठी दुधू देते ..

Teddy दादा काय करतो? काय करतो?

बाळासोबत च्याऊ म्याऊ खेळतो..

मिकी मिनी काय करतात? काय करतात?

बाळासोबत डान्स करतात..

डोनाल्ड दक् हा काय करतो ? काय करतो?

बाळासोबत quack quack करतो..

भू भू प्लुटो काय करतो? काय करतो?

लांब दुरून Balll आणतो..

Tom and Jerry काय करतात? काय करतात?

बाळासोबत पकडापकडी खेळतात..

Bugs Bunny हा काय करतो? काय करतो?

दोन दात पुढे करतो..

असे हे बाळाचे सवंगडी..

आई – बाबांना प्रिय भारी..

छोटू बाळा खेळतो..

खेळता खेळता दमतो..

आणि.............

आईच्या कुशीत झोपतो........

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...