तुझ्यात मी
माझ्यात तू
आयुष्यात रंग
भरतोस तू
नि:शब्द असता
बोलतोस तू
शब्दांना वाट
देतोस तू
काय करू
कसे करू
काही न करता
थांबवितोस तू
जगण्याची वाट
होता अंधुकही
प्रकाशाचा सडा
पाडतोस तू
दुनिया असो
खरी खोटी
जगण्यात मौज
आणतोस तू
रांगोळी सुंदर
मी काढता
रंग त्यामध्ये
भरतोस तू
तुझ्यात मी
माझ्यात तू
नेत्र हे गहीवरता
पुसतोस तू ...
पुसता पुसता
हसतोस तू ...