सकाळच्या
कोवळ्या लख्ख
चमचमत्या सूर्यप्रकाशात
मी न्हाऊन निघाले..
प्रसन्न मनाने हळूच
सृष्टी कर्त्याला विचारले
“ का रे असे जग निर्माण केले ?
एकीकडे आहे
प्रकाशित पायवाट
प्रसन्नतेने नटलेली...
तर दुसरी कडे आहे
एकाकी पायवाट
काळोखात बुडालेली...”
हळूच तो हसला…
म्हणाला,
“अगं, पायवाट आहे तीच
पण ठेवायची काळोखात
की लख्ख मिणमिणत्या दिव्यांनी
उजळवायची प्रकाशात
हे तर आहे
तुझ्याच हातात...
बघ जमतय का..”