तृषार्त असा मी
एक वाटसरू...
तृषार्तांसाठी
जलदाता तू...
भुकेलेला मी
एक पांथस्थ...
भुकेलेल्यानसाठी
अन्नदाता तू...
‘मी’ कोण म्हणुनी काय पुसतासी?
मी एक तहानलेला भुकेलेला
पांथस्थ...वाटसरू...
‘तू’ कोण म्हणुनी काय पुसू?
तू आहेसच
जलदाता, अन्नदाता, जीवनदाता..
लेकरांचा सांभाळ करणारा ‘मायबाप’
No comments:
Post a Comment