कधीतरी सुचतात काही ओळी
पण वाटत नाही लिहाव्याशा
ओळीच त्या...
रेंगाळत राहतात
घुटमळतात
की वाट बघतात..?
कोणाची.. कशाची..?
झाली भावनांची गर्दी की
येतात चालत आपसूक
कोऱ्या एका कागदावर
अर्थ असतोच त्यांना असे नाही
आणि नसतोच असेही नाही
वाटतेच..
लिहावे काही
सुखद, छान वाटणारे.. सुंदर असे काही
पण तसे जमेलच असेही नाही..
ओळी शहाण्याच असतात
आणि चालतात एक वाट
कधी सुखाची...
कधी दुःखाची...