Showing posts with label light-poem. Show all posts
Showing posts with label light-poem. Show all posts

Wednesday, November 2, 2022

खूप आनंदी आहे आयुष्य




खूप आनंदी आहे आयुष्य 
भरभरून जगले तर 
सुख दुःखांच्या पार जाऊन 
क्षणाक्षणांनी वेचले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
टवटवीत ठेवले तर 
भरल्या आभाळाकडे पाहून 
ओले चिंब भिजले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
मान अपमान सोडले तर 
रोग शोक बाजूला सारून 
मन सुंदर ठेवले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
सतत शिकत राहिले तर 
अनुभव समृद्धी मिळत राहते 
कामात व्यस्त राहिले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
मनाने ठरविले तर 
चंद्र सूर्याला साक्षी ठेवून 
हसऱ्या डोळ्यांनी पाहिले तर... 

 - आसावरी समीर

just-be-happy


Wednesday, April 20, 2022

जीवन म्हणजे नाटक

 

जीवन म्हणजे नाटक
रंगमंचावर रंगलेले 
सुंदर आभूषणे घालून 
नट नट्यांनी सजलेले 

प्रत्येक जण चढवितो 
मेकअप फसव्या भावनांचा 
उभा राहतो रंगमंचावर 
खेळ चाले क्षणांचा 

उत्कंठा असते प्रत्येकाला 
काय घडेल आता पुढे 
थांबला तो संपला 
हाच नियम नित्य घडे 

सुख-दुःख यश-अपयश 
दिसते नाटकात क्षणोक्षणी 
आहे का हो याला 
अपवाद म्हणतात तो कुणी 

मोहमाया द्वेष असूया 
षड्रिपूंनी भरलेले नाटक 
तोल सांभाळायला असावेच लागते 
सद्गुणांचे छानसे पात्र 

नाटक जगावे समरसून 
संत सज्जन सांगतात बरेच 
एक्झिट होताना 
समाधानाची पावले 
चालत निघावी दाराकडे 

जीवन म्हणजे नाटक 
रंगमंचावर रंगलेले 
हसून सजवावे एवढेच सांगणे 
आनंद नांदावा चोहीकडे.. 

-आसावरी समीर 

Life-is-drama


Monday, April 18, 2022

Be Happy!

 
towards the moon 
into the sky
I met a bird 
flying by… 
roaming happily 
in his ways
Life is good”.
all that he says...
 
towards the forest 
very green
I met a tree
very lean… 
standing tall 
in his ways
Stay strong” 
all that he says...
 
towards the water 
into the ocean
I met a fish 
in motion… 
swimming along 
in his ways
Be happy
all that he says!

Be-Happy


Thursday, January 14, 2021

हे सागरा





शांतता अथांगता
तुझीया जगाची 
गूढता

सौम्यता रौद्रता
तुझीया रूपाची 
भिन्नता 

अगम्यता, अलभ्यता
ओढणारी 
आर्तता 

होऊ नी स्वार 
लाटांवरी 
गेयता 
क्षणोक्षणी 

जग तुझे 
भावते 
आबालवृद्ध 
असो कुणी... 

हे सागरा
हे मंदिरा
भाळतो पाहुनी 

नमन

तुज मनोमनी



Sunday, November 15, 2020

पणती

Light-a-diya

एक पणती 
आली दारी 
चहूकडे 
प्रकाश पसरी

सौम्य शांत 
तेजस्वी ज्योत 
बघता तिज
होई प्रसन्न चित्त 

नमस्कार माझा
ह्या पणतीला
लख्ख उजळो
दिशांचा पसारा

Tuesday, September 29, 2020

तू आहेस


तू आहेस 
अखंड बडबड... 
नि :शब्द करणारी 

तू आहेस
सुंदर चांदणी ...
शुक्रासारखी

तू आहेस
हळूच फुंकर...
दुःखा वरची

तू आहेस 
दाट सावली.. 
माया देणारी 

तू आहेस
सुंदर खळी
गालावरची 

तू आहेस 
निर्मळ मनाची 
सानुली गोजिरी 

तू आहेस 
मुलगी माझी .. 

ओंजळ भरगच्च 
प्रेमाने भरणारी 

Daughter-angel




Tuesday, September 1, 2020

पाऊस सृजनाचा


सृजनाचा
गुलाबी पाऊस
पडतोय सर्वत्र
भिजवतो चिंब
बुडवितो आकंठ

ह्याच पावसात
दिसते आहे
हिरवी दिशा
हिरवी पहाट...
आणि सापडते
सृजनाची
पांढरी स्वच्छ वाट

ह्या वाटेवर
पडतोय
मंद प्रकाश
किंचितसा पिवळा
किंचित लाल
आणि निळ्याशार
पाण्या सोबत
मिसळतोय
सृजनाचा घाट

घाटावरील मंदिर
त्यावरील केशरी
पताका
सोबतीला आहेच
विटकरी रंगावर उभा
माझा काळा विठोबा... 
Being-creative


Tuesday, August 11, 2020

कृष्ण गीत

 

सुंदर मुरली

वाजे मधुर

जीवनात मिसळले

सप्त सुर

मैफिलीत आहे

तुझेच नाव

मुरली मनोहर

राधे श्याम


आनंदाचा

देई छंद

राधा – मोहन

प्रीत मकरंद

कृष्ण कन्हैया

तुझेच नाव

बंधु सखा

अन पालनहार


निर्गुण सगुण

रूप तुझे

मनमोहक

श्याम वर्ण

विराजे

आभाळी ही

तुझेच नाव

सुंदर माधव

मेघ: श्याम

 

नभ भरून येता

दिसतो तूच

थेंबात ह्या

वसतोस तूच

घे माझा

एक प्रणाम

हरी गोविंद

पंचप्राण...

  

Lord-Krishna

 

 

 

 


Saturday, August 8, 2020

माझ्या आयुष्याची नाव

माझ्या आयुष्याची नाव
चालते तरंगत...
कधी संथ
कधी धावत...
पाण्याच्या ओघाने
रस्ता शोधत...

पाण्याची सोबत
आहेच अखंड...
कधी हे पाणी
झुळझुळते...
गोड गाणी म्हणते...
तर कधी
रौद्ररूप धारण करत
नाकी नऊ आणते...

न बुडण्याचा
प्रयत्न करत
नाव हेलकावे खाते...
आणि
सौम्य शीतल प्रवाहात
हळूच शिरताच
गुणगुणते...

"नाविका रे वारा वाही रे
डौलाने हाक जरा आज नाव रे..."
Sail-through-life


Tuesday, July 28, 2020

चिंब ठेवण...

चिंब तुझे मन
चिंब माझे मन
ओल्या काळजाची
चिंब आठवण...

चिंब हवा
चिंब वारा
भिजल्या पापण्यात
चिंब धारा...

चिंब ओठी
चिंब धून
सुक्या ओंजळीत
चिंब ठेवण...

Rainy-days

Wednesday, July 15, 2020

अमिताभला झाला करोना

अमिताभला झाला करोना
चैन उराला पडेना

चॅनेल खूप बदलले
त्याचे हाल हवाल जाणले

नाश्ता त्यांने केला का
जेवण त्याला गेले का

बातमी सगळी इत्थंभूत
चॅनेलवाले पंचमहाभूत

अमिताभचे आम्ही फॅन
त्याला करतो big सलाम

होवो त्याची स्पीडी रिकवरी
चॅनेलवाल्यांची जाईल बेचैनी

'तुम्हारे पास क्या है'
विचारले अमिताभ ला

तर भारतीयांच्या मनातले स्थान
असे तो म्हणाला...

 खरेच आहे त्याचे म्हणणे
उगाच का चॅनेल्स
त्याच्या पाठी लागले...

Amitabh-gets-Corona



Thursday, June 25, 2020

इंद्रधनु


इंद्रधनु हा
नभी झळकला
बहु रंगांनी
आसमंत न्हाला

रवी किरणे
प्राषुनी
जलबिंदू हा
सप्तरंगी जाहला

काय वर्णावी
ही किमया
मनीमानसी
हर्षोल्हास आला

स्तंभित मी
रोखूनी बघता
जीवनी या
नवरंग उधळला...

इंद्रधनू तू
आहे न्यारा
घे सलाम तुझ्या
ह्या सौंदर्याला...

घे सलाम तुझ्या
ह्या सौंदर्याला...

beautiful-rainbow

Image by Albrecht Fietz from Pixabay 


Wednesday, June 17, 2020

लोणचे


घातले आता
लोणचे वर्षभराचे
तेलाचा तवंग
त्यावर नाचे

न मुरलेले
ताजे चविष्ट
भाजी लोणचे
मैत्री घनिष्ठ

भरपूर घाला
मालमसाला
लोणच्याची चव
जणूकाही ज्वाला

तेल घाला
थोडे कमी
बुरशीचा आघात
आहे दारी

मुरलेले लोणचे
असते गब्बर
त्याला नसते
कशाची सर

जीवनही आहेच की
लोणच्यासारखे
तावून-सलाखून
मुरल्या सारखे...


#lovepickles #lovepicklesquotes #picklesarelife #pickles #picklesrecipe

Wednesday, June 3, 2020

पावसाळी आठवणी


खुप पावसाळे आले आणि गेले
आठवणींचे ढग साठवून गेले

आठवण कधी येते हिरव्या रानाची
उत्स्फूर्त, उत्श्रुंखल, खळाळत्या मनाची

गेलो कुठेतरी कड्या कपारी
निसर्गाची किमया किती पहावी...

निघाली एक आठवण त्या पावसाळ्याची
चिंब भिजून भटकण्याची...

मक्याचे कणीस आणि गरम दाणे
थंडीमध्ये पावसाळी उब  घेणे...

कधीतरी आठवतो लहानपणीचा पावसाळा
डोळ्यात साठतो मायेचा ओलावा...

आठवते  बिना रेनकोट छत्री ची
शाळेला मारलेली बुट्टी...

पावसाची होडी मनावर तरंगत
पार करते आठवणींची नदी...

पावसाला विचारले
तू येतो का असा
देऊन जातो
आठवणींचा वसा

कधीतरी एक आठवण अशी येते
डोळ्यात पाऊस देऊन जाते
अशा वेळी तू आणि मी
दोघेच असावे
पुराचे पाणी ओसरलेले पहावे...

Wednesday, May 27, 2020

चारोळ्या - 2



अंगणात पडलेल्या
फुलांच्या सड्यातून
नाही उचलले जात फूल
कारण  नजर असते
झाडावरील टवटवीत फुलाकडे
असाच काहीसा असतो का
गरीब श्रीमंतीचा भेद
====================

आपल्यामध्ये आपणच
असतो धुंद
पण वाटते जगावे
पाखरासारखे स्वच्छंद
====================

चूक होतेच प्रत्येकाची
पण चुका सुधारणे जमायला हवे
आपल्या चुकांचे खापर
आपल्यावरच फोडायला हवे

Thursday, May 21, 2020

तारीख वार


दिवस कोणता?
तारीख कोणती?

माहीत नाही...

हिशेब दिवसांचा
लागत नाही...

गणित तारखांचे
जमत नाही...

कळते एकच...

दिवस गेला
हातातुनी...

सुख दुःखाची
गोळाबेरीज करुनी

क्षणांची मांदियाळी
सरता सरूनी...

हाती आली
स्मरण चित्रे

तारीख वार
विसरूनी...

Thursday, May 14, 2020

चारोळ्या - 1




करतात का पक्षी
खूप सार्‍या गोष्टी गोळा
आपण मात्र अडकतो
आपल्याच गोतावळ्यात...
-------------------------------

छोट्या मुलांचे जग असतेच
निरागस
एक दिवस रागावले तरी
दुसर्‍या दिवशी
येतातच मिठीत
सारे काही विसरून...
आणि आपण ?
------------------------------

परस्परावलंबी बनून
वाटून घेतले काम
तर तू माझी राणी
मी तुझा राजा..अन्यथा आहेच...
तू तू ---- मै मै

Thursday, May 7, 2020

माँ

 
मैं माँ हूँ

मेरा बच्चा मेरा विश्व है
क्यों की मैं जानती हूं
यह बच्चा ही कल का विश्व है...

बच्चे के साथ हसते खेलते
जी लेती हूं कुछ पल
यादे ताजा होती है
मेरे खुद के बचपन की

वैसे जीवन का सफर बडा कठीण है
पर मेरे लिये आसान बन जाता है...
जब बच्चा आके मुझे चिपक जाता है...
और कहता है...

माँ..कहा गयी थी तुम ?

Sunday, April 26, 2020

आपणच आपलं जग शोधावं



मन म्हणालं...
आपणच आपलं जग शोधावं...

काहीसं रंगीत,
थोडसं ब्लॅक अँड व्हाईट
रंगसंगतीच्या पल्याड जाणारं...
पावसाच्या थेंबात प्रतिबिंब बघत
सुरांच्या दुनियेत स्तब्ध होणारं...
अक्षरांच्या गर्दीत वाक्य शोधत
वाक्यांमध्ये अर्थ वेचणारं...
आपणच आपलं जग शोधावं...

पदार्थांच्या यादीत
जगण्याचा मेनू निवडत
जगण्यावर
खुशाल ताव मारणारं...
मातीला स्मरून
तार्यांच्या अंबरात फिरत
आपणच आपलं जग शोधावं...

शरीरावरील वयाच्या खुणा
न लपवताही
किंचितसा मेक अप करून
गालावरील हास्यफुल
सदा उमलते ठेवत
दुःखाच्या कोंदणात
थोडेसे सुख पेरत
आपणच आपलं जग शोधावं..


Discover-own-world


Wednesday, October 2, 2019

खरे मित्र


मन मोकळे करण्यासाठी
हवी असते एक मोकळी जागा
अथांग समुद्रात
अशी जागा सापडणे
काहीसा असतो नशिबाचा धागा

खरे मित्र
काहीसे दुर्मिळ
टिपून आणतात चांदणे 
ओंजळीमध्ये पाणी देऊन
भागवितात
प्रेमाची तहान

खरे मित्र आणि केसर
नाहीतच वेगळे
दुधात थोडेसे घातल्यास
आयुष्याचा रंग आणि
आयुष्याची चव
बदलते\सारेच

खरे मित्र
करतात आठवणीने फोन
का गं... कशी आहेस? विचारताच
जमतात गप्पांचे फड
पुन्हा कधी भेटणार आपण
म्हणताच
जमून येतात
आठवणींचे ढग...

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...