सृजनाचा
गुलाबी पाऊस
पडतोय सर्वत्र
भिजवतो चिंब
बुडवितो आकंठ
ह्याच पावसात
दिसते आहे
हिरवी दिशा
हिरवी पहाट...
आणि सापडते
सृजनाची
पांढरी स्वच्छ वाट
ह्या वाटेवर
पडतोय
मंद प्रकाश
किंचितसा पिवळा
किंचित लाल
आणि निळ्याशार
पाण्या सोबत
मिसळतोय
सृजनाचा घाट
घाटावरील मंदिर
त्यावरील केशरी
पताका
सोबतीला आहेच
विटकरी रंगावर उभा
माझा काळा विठोबा...
No comments:
Post a Comment