Wednesday, November 2, 2022

खूप आनंदी आहे आयुष्य




खूप आनंदी आहे आयुष्य 
भरभरून जगले तर 
सुख दुःखांच्या पार जाऊन 
क्षणाक्षणांनी वेचले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
टवटवीत ठेवले तर 
भरल्या आभाळाकडे पाहून 
ओले चिंब भिजले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
मान अपमान सोडले तर 
रोग शोक बाजूला सारून 
मन सुंदर ठेवले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
सतत शिकत राहिले तर 
अनुभव समृद्धी मिळत राहते 
कामात व्यस्त राहिले तर 

खूप आनंदी आहे आयुष्य 
मनाने ठरविले तर 
चंद्र सूर्याला साक्षी ठेवून 
हसऱ्या डोळ्यांनी पाहिले तर... 

 - आसावरी समीर

just-be-happy


1 comment:

Ruchali said...

खूप छान केलीय कविता

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...