जीवन म्हणजे नाटक
रंगमंचावर रंगलेले
सुंदर आभूषणे घालून
नट नट्यांनी सजलेले
प्रत्येक जण चढवितो
मेकअप फसव्या भावनांचा
उभा राहतो रंगमंचावर
खेळ चाले क्षणांचा
उत्कंठा असते प्रत्येकाला
काय घडेल आता पुढे
थांबला तो संपला
हाच नियम नित्य घडे
सुख-दुःख यश-अपयश
दिसते नाटकात क्षणोक्षणी
आहे का हो याला
अपवाद म्हणतात तो कुणी
मोहमाया द्वेष असूया
षड्रिपूंनी भरलेले नाटक
तोल सांभाळायला असावेच लागते
सद्गुणांचे छानसे पात्र
नाटक जगावे समरसून
संत सज्जन सांगतात बरेच
एक्झिट होताना
समाधानाची पावले
चालत निघावी दाराकडे
जीवन म्हणजे नाटक
रंगमंचावर रंगलेले
हसून सजवावे एवढेच सांगणे
आनंद नांदावा चोहीकडे..
-आसावरी समीर
No comments:
Post a Comment