मन मोकळे करण्यासाठी
हवी असते एक मोकळी जागा
अथांग समुद्रात
अशी जागा सापडणे
काहीसा असतो नशिबाचा धागा
खरे मित्र
काहीसे दुर्मिळ
टिपून आणतात चांदणे
ओंजळीमध्ये पाणी देऊन
भागवितात
प्रेमाची तहान
खरे मित्र आणि केसर
नाहीतच वेगळे
दुधात थोडेसे घातल्यास
आयुष्याचा रंग आणि
आयुष्याची चव
बदलते\सारेच
खरे मित्र
करतात आठवणीने फोन
का गं... कशी आहेस? विचारताच
जमतात गप्पांचे फड
पुन्हा कधी भेटणार आपण
म्हणताच
जमून येतात
आठवणींचे ढग...