Showing posts with label star. Show all posts
Showing posts with label star. Show all posts

Sunday, February 9, 2020

चांदणी


क्षितिजावरी हासे
शुभ्र चांदणी
पुसतसे मजला
आहे का मी देखणी

वाटे मजला
ती अनुपम, उत्कट
काहीशी लाजरी
नववधूचे सौन्दर्य
दाटले तिच्या ठायी

चांदणी,
आहेस तू देखणी
जणू भाळीची
कुमकुम टिकली...
तुझ्या कडे
पाहताच आठवे
रात्र ती पहिली
सलज्ज अशी तू
अनुपम सुंदर

चांदणी...




खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...