नेहमीच नाही पण कधी असेही घडते
सहज बोलता बोलता
मी स्वतःला हरवून बसते...
ऑफीसला जाण्यास तशी मी रोज तयार होते
पण कधितरी मनाचे स्टिअरींग्
रानावनात धुन्द फिरुन येते
नेहमीच जेवते कॅंटीन मध्ये जेवण्
पण आईच्या हातचे जेवण
खुप खुप मिस करते..
नेहमिच होत रहातात ऑफिस मध्ये
डिस्कशन्स आणि चर्चा
पण आठवत रहातात त्या
रात्र रात्र भर मारलेल्या
मैत्रिणींसोबतच्या गप्पा..
नेहमीच नाही पण कधितरी असे होते
जुन्या आठवणी काढून हसता हसत्ता
डोळ्यात हळूच पाणी येते..
नेहमीच नाही कधितरी असे होते
माझी मी विचार करता करता
खुदकन हसु लागते...