इंद्रधनु हा
नभी झळकला
बहु रंगांनी
आसमंत न्हाला
रवी किरणे
प्राषुनी
जलबिंदू हा
सप्तरंगी जाहला
काय वर्णावी
ही किमया
मनीमानसी
हर्षोल्हास आला
स्तंभित मी
रोखूनी बघता
जीवनी या
नवरंग उधळला...
इंद्रधनू तू
आहे न्यारा
घे सलाम तुझ्या
ह्या सौंदर्याला...
काही कल्पना..काही भावना..काही विचार..काही आचार.. काही गोष्टी.. काही किस्से.. हेच काहीसे गुंफलेले ..शब्दांमध्ये!
खूप आनंदी आहे आयुष्य भरभरून जगले तर सुख दुःखांच्या पार जाऊन क्षणाक्षणांनी वेचले तर खूप आनंदी आहे आयुष्य टवटवीत ठेवले तर भरल्या आभाळाकड...