Showing posts with label hoping-for-best. Show all posts
Showing posts with label hoping-for-best. Show all posts

Wednesday, March 11, 2009

आशेचा किनारा

निसर्ग असा गप्प का?
वारा असा उदास का?
ग्रीष्म आग ओकतो
म्हणुन का असे शुष्क व्हायचे?
जेीवनाला कंटाळुन
जीवनगाणेच विसरुन जायचे...?
विसरायचे नाही
ग्रीष्म आहे म्हणुनच येतात जलधारा
संकटाच्या समुद्रालाही आहे 'आशेचा किनारा'
हा तरुसुद्धा सुर्याची आग झेलतो आहे
पण सुर्यच आहे जीवनदाता
पुर्णपणे जाणतो आहे
आपले कधी आपले वैरी होतिल का?
कितीही रागावले तरी
आपल्याला सोडुन जातिल का?
सूर्यसुद्धा जातो सोडुन आपल्याला
पण तेही सुद्धा पुन्हा परतायला
परतीच्या वाटा कधीही बंद होत नाही
आपलीच सावली आपल्याला सोडत नाही...

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...