Showing posts with label Diwali Festive season. Show all posts
Showing posts with label Diwali Festive season. Show all posts

Sunday, October 6, 2019

दिवाळीचे महत्त्व - दिवाळी महात्म्य माझ्या नजरेतून



सर्व सणांमध्ये दिवाळीचे महत्त्व मोठे आहे..

आता दिवाळीची चाहूल लागली आहे .. घरांची साफसफाई सुरू झाली असेल..

तसा दिवाळीचा थाट मोठा आहेच.. दिव्यांची रोषणाई, रांगोळ्या, सजावट, आणि फराळ... !

असो... दिवाळी कधी सुरू होते ? टीव्ही वर जाहिराती सुरू होतात तेव्हा ...

उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ...!!! ;-)

ही मनाला भावणारी जाहिरात कधीच न पुसली जाणारी आहे.. (Hats off to Master Minds Behind this Ad!)

असो ..आता बघूया जरा दिवाळी महात्म्य .. माझ्या नजरेतून..

एरवी अभ्यंग स्नान कधी न करणारी मी दिवाळीला मात्र लवकर उठून बाथरूम मध्ये पणती लावून अभ्यंग स्नान करते! सूर्योदयापूर्वी प्रकाशाचा मान पणत्याना देणे म्हणजे त्यांच्यात असलेल्या तेजाला नमन करणे! नंतर उगवत्या सूर्याला नमन करून दिवाळीची एक खास प्रार्थना मनोमन सूर्याजवळ मांडणे हा पण एक अनुभव असतो.

पहाटे पणत्याच्या प्रकाशात रांगोळीशी लहानपणापासून असलेले नाते पुन्हा उफाळून वर येते.मागच्या वर्षी पासून मी मुलीला पण नरक चतुर्दशी ला सूर्योदयापूर्वी उठवायला सुरुवात केली. सकाळी उठून माझ्या बरोबरीने तिने रांगोळी काढण्यास सुरुवात केली...तेव्हा विश्वास दृढ झाला ही माझीच मुलगी आहे :-)

घरातल्या मंडळीचे औक्षवण, उटणे लावून मालीश, सकाळी केलेली देवाची पुजा, ताजा गरम प्रसाद बनविणे मन प्रफुल्लित करायला पुरेसा असतो. लहानपणी आई हे सगळे करायची, कदाचित त्यामुळेच माझ्यातली आई आता जाणीवपूर्वक सगळ्या प्रथा पाळते. आणि स्वत: केल्यानंतर त्यातली जादू आणखीनच कळायला लागते! हयातून निसर्गाशी असलेले नाते अधिकच दृढ होते. दिवाळीच्या पणत्याचे तेज एक सकारत्मकता मनाला देऊन जाते. (ती ताकद फटाक्यांच्या रोषणाई मध्ये नाही )

पणती काय सांगते...?

अगं बाई, जेव्हा तू झिजशील तेव्हा प्रकाशमय होशील ...! तुझ्या मिणमिणत्या प्रकाशाने जगातला अंधार नाहीसा होणार नाहीच आहे..पण तुझ्या आतला अंधार तर नक्कीच दूर होईल...आणि तुझा शीतल प्रकाश अनुभवणार्‍याच्या डोळ्यांना नक्की शांतता देईल..

लक्ष्मीपूजन - बहुतेक सर्व लोकांना लक्ष्मीचे पूजन आवडते. पण लक्ष्मी अनुभवायची असेल तर सकाळी उठून एम.एस . सुब्बलक्ष्मी यांचे श्री महालक्ष्मी सुप्रभातम जरूर ऐकावे . शांतलक्ष्मी जरूर सोनपावलानी दारी येते.

लक्ष्मीपूजनाला धान्याची लक्ष्मी काढणे, धान्य लक्ष्मी तसेच मातीच्या लक्ष्मीची सजावट करणे, पणत्या लावणे, फुलांची रांगोळी काढणे, घरात लक्ष्मी पाऊले काढणे, आणि मनोभावे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, ची पूजा करणे हा एक सौख्यदायी अनुभव असतो.

(मला हा अनुभव लग्न झाल्यानंतर आला जेव्हा मी स्वत: पूजेची तयारी करायला लागले... लग्न झाल्यानंतर बर्‍याच गोष्टी समजायला लागतात हे खोटे नाही :-) )

असे म्हणतात सर्वांनी आपल्या राहत्या घरात मनोभावे (लक्ष्मी च्या विविध बाजू समजून) लक्ष्मीपूजन केल्यास Lakshmi Gives Prosperity.. (It doesn't really mean only Material Prosperity)

May goddess Lakshmi give you true wealth and prosperity this Diwali !

असो लक्ष्मीपूजनाला माझ्या सासरी पतीपत्नींचा पाडवा साजरा करतात. असे का हे मला देखील माहीत नाही. त्याने मला फरक पडत नाही (आम्हा पती पत्नीचे नाते उत्तम आहे तोपर्यंत!)

त्याच्या जवळ एकच मागणे असते. मला घरकामात असाच मदत करत जा..बाकी पैसा अडका, दागदागिने काही नको ;-) आधुनिक काळात घराचे बरेचसे सौख्य नवरा घरकामात किती सहभागी असतो यावर अवलंबून असते हे काही खोटे नाही. शेवटी घरातले काम सर्वांनी मिळून मिसळून केले तर घरातले मांगल्य टिकून राहते. आधुनीक स्त्री घरात काम करणारी असो की घराबाहेर तिची सुप्त इच्छा असतेच कधीतरी एक गरम चहाचा कप हाती यावा :-)

(One of the reasons of divorces/marital discord these days come from not taking care to help each other in household chores...

When you work together, you truly live together!

So, I appeal all the mothers/fathers to train their boys and girls in taking care of the household chores as well)

असो. वरच्या गोष्टी दिवाळी संदर्भात नाही पण कदाचित महत्त्वाच्या आहेत म्हणून लिहिले.

पाडवा : एकदा आम्ही बेल्जियम मध्ये टॅक्सी ने प्रवास करत होतो.माझी मुलगी झोपी गेली होती म्हणून नवर्‍याने तिला कडेवर घेऊन टॅक्सी पकडली होती. ड्रायव्हर रोमानिया चा होता. आम्हाला म्हणाला, मला पण मुलगी आहे...

"I have a daughter.. and it's true...Daughters are for Fathers !"

असे सर्वत्र वडील आणि मुलीचे नाते स्पेशल मानले जाते. आणि आपल्याकडे ते नाते साजरा करायचा दिवस पाडवा आहे आणि तो उत्साहाने मनवायलाच हवा.!

भाऊबीज : चंद्र आणि आपले नाते अतूट आहेच आहे.. कधी तो सखा आहे तर कधी मामा तर कधी भाऊ... चंद्रासोबतचे नाते वृद्धीगंत करणे म्हणजे त्याला ओवाळणे ही भाऊबीजेची प्रथा Awesome म्हणायला हवी.. तो चंद्रही या दिवशी अगदी आतुरतेने वाट पहायला लावून अगदी थोड्या वेळासाठी येतो. दिसला तर नशीब नाही तर दृष्टी आड सृष्टी :-)

चंद्राचे आणि आपले नाते जसे अतूट आहे तसेच भावा बहिणीचे नाते अतूट राहावे ही त्या मागची खरी कल्पना असावी. त्यामुळे भाऊबीज Celebration is must!

दिवाळी सणाचे महत्त्व परदेशात आल्यावर अजून जास्त कळते कारण आप्तेष्ठांच्या भेटीशिवाय दिवाळीला ती मजा येत नाही.त्यामुळेच हे लेखन घडले...

आई वडिलांना व ज्येष्ठांना नमस्कार, भावा बहीणींशी गप्पा टप्पा, लहान मुलांसोबत किल्ला/ आकाशकंदिल बनविणे, घर सजविणे, रांगोळ्या काढणे, पणत्या लावणे, फराळ बनविणे आणि त्यावर ताव मारणे, नवीन कपडे घालणे, आपल्या कुवतिनुसार गरजूंना दान करणे यातच दिवाळीचे सार सामाविले आहे असे वाटते...

फटाके फोडणे यातून मुद्दाम वगळले आहे कारण जाणीवपूर्वक समजून उमजून साजर्‍या केलेल्या दिवाळीत फटाके नावाच्या विषाला स्थान नाही. * फटाके हे नाकातोंडात जाणारे विष आपण प्राशन करतो आहे आणि आपली भावी पिढी यामुळे धोक्यात येणार आहे असे मानले की विषय तेथेच संपला... !

सर्वांना नम्र विनंती -

फटाके बंदी जरूर अमलात आणा .
फारच फटाक्यांच्या कलर्स च्या प्रेमात असाल वेगवेगळी फुलझाडे आजूबाजूला लावा. रंगीबेरंगी आकाशकंदिल लावा.
आवाजाच्या प्रेमात असाल तर मस्त जोरदार ठेक्याची गाणी ऐका..You will feel more awesome!

Green Diwali - Clean Diwali!!!
-------------------------------------------------------------------------
प्रि-दिवाळी साफसफाई साठी आणि रुचकर फराळ बनविण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!

दिवाळी महात्म्य सुफळ संपूर्ण!!

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...