चिकित्सा करतो
काही गोष्टींची
उगाचच
त्याच त्या गोष्टी
उगाळत राहतो
उगाचच
नको असताना
खात राहतो
उगाचच
ढीगभर वस्तू
जमा करतो
उगाचच
वाहत राहतो
भावनांच्या प्रवाहात
उगाचच
पण
कधीतरी
भरल्या आभाळी
हसून पहावे
उगाचच
कधीतरी गुणगुणावे
आपलेच गीत
उगाचच
कधीतरी भिजावे
स्वप्नांच्या पावसात
उगाचच
कधीतरी
तू आणि मी
निःशब्द बघावे डोळ्यात
उगाचच...