खुप पावसाळे आले आणि गेले
आठवणींचे ढग साठवून गेले
आठवण कधी येते हिरव्या रानाची
उत्स्फूर्त, उत्श्रुंखल, खळाळत्या मनाची
गेलो कुठेतरी कड्या कपारी
निसर्गाची किमया किती पहावी...
निघाली एक आठवण त्या पावसाळ्याची
चिंब भिजून भटकण्याची...
मक्याचे कणीस आणि गरम दाणे
थंडीमध्ये पावसाळी उब घेणे...
कधीतरी आठवतो लहानपणीचा पावसाळा
डोळ्यात साठतो मायेचा ओलावा...
आठवते बिना रेनकोट छत्री ची
शाळेला मारलेली बुट्टी...
पावसाची होडी मनावर तरंगत
पार करते आठवणींची नदी...
पावसाला विचारले
तू येतो का असा
देऊन जातो
आठवणींचा वसा
कधीतरी एक आठवण अशी येते
डोळ्यात पाऊस देऊन जाते
अशा वेळी तू आणि मी
दोघेच असावे
पुराचे पाणी ओसरलेले पहावे...
No comments:
Post a Comment