Friday, June 5, 2020

गुलाबी प्रेम


नवरा म्हणाला एकदा
चल बाहेर जाऊ
पाणीपुरी खाऊ
रानावनात भटकून येऊ...

मी म्हणाले हसून
तुला बरे आहे ना?
भलत्या रंगात
दिसतो आहे आज...

तो म्हणाला हसून
नेहमीच मी रंगात असतो
तुझ्याच गुलाबी प्रेमाच्या
साबणाने अंघोळ करतो...

मी म्हटले फटकारून
असे कधी म्हटले
तुझ्यावर मी प्रेम करते
तुला मात्र उगीच असे वाटते

तो जवळ येऊन म्हणतो
शब्दांनी तर आपले
भांडणच होते
प्रेम हे करायचे असते
बोलून दाखवायचे नसते...

विरघळून मी जाता
पटकन एक
पाणीपुरी भरते...




2 comments:

SA P said...

Very nice ����

Asawari said...

Thank you...

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...