चांदण्यांच्या प्रकाशात
दारी आला देव
म्हणाला
चलतेस का प्रकाशात
की तुला नाही वेळ...
त्रासून मी म्हणाले
देवा..
काम एवढे पूर्ण झाले
तर काढते थोडा वेळ..
तुझाच व्याप..तुझाच पसारा
आवरता आवरता
जीव होई थोडा
हसून म्हणाला देव;
अग खुळे,
प्रकाश आहे जीवन
प्रकाश आहे स्फुरण
प्रकाश आहे प्रसन्न हृदय
आणि प्रकाशच आहे सुंदर मन
प्रकाशाच्या सान्निध्यातच
करू शकतेस काम
आणि मग होईल तुझे फिरून
चारही धाम...
No comments:
Post a Comment