Wednesday, July 1, 2020

विठ्ठल

 
नाही वारी
नाही पंढरी
विठ्ठल बसला
द्वार लावूनी

उघड विठुराया
द्वार आपुले
मागणे मागतो
काकुळतीने

का रूसलासी
सांग आता
धाव पाव
सत्वरिता

चुकलो आम्ही
तुझी लेकरे
सांभाळूनी घे
आम्हा देवा

आहे तू
भक्तीचा भुकेला
आम्ही भुललो
पांडुरंगा

काळे सुंदर
रूप तुझे
जगी पाहतो
तुझीच रुपे

रुक्मिणी सवे
ये लवकरी
असु दे माया
आम्हावरी

विठ्ठला तू
वेडा कुंभार
मनी प्रेम हे
अपरंपार...

-आसावरी समीर

No comments:

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...