Thursday, March 26, 2009

एकच आयुष्य

एकच आयुष्य
दिले देवाने
जगण्यासाठी...

एकच आयुष्य
क्षणाक्षणाने,कणाकणाने
नसानसात भिनण्यासाठी

एकच आयुष्य
कितीही प्लान केले
तरी अनप्लान्ड जगलेलं..

एकच आयुष्य
जीवन मृत्यूच्या
दरम्यान अडकलेलं..

एकच आयुष्य
पण किंमत त्याची
कळू नये हे दुर्दैव..

एकच आयुष्य
किंमत कळता
जगण्याचा,सृजनाचा
आनंद देणारं...

एकाच आयुष्यात
पण करावयाच्या आहेत
कितीतरी गोष्टी...

एकच आयुष्य
पुरेल का रे देवा?
की तरीही उरतील
करावयाच्या काही गोष्टी...

3 comments:

Saurabh said...

Good one
A poem showing heavy weight side of a lighthearted person :D

Niraj said...

ह्र्दयाला चिरुन जानारी हि कविता सदैव स्मरणात ठेवावी अशी आहे !

दिपक जोशी, 9423932045 said...

उरल्याच काहीगोष्टी तर...

घेउ जन्म पुन्हा,
देईल तो ही सहज.
मग काळजी कशाला.....

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...