Thursday, October 3, 2019

प्लास्टिक नावाचा भस्मासुर


प्लास्टिक नावाचा भस्मासुर
एकदा पृथ्वीवर आला
बघता बघता त्याने
हाहाकार केला

प्राण्यांच्या जीवाचे
झाले हाल
पोटात प्लास्टिकचे
गोळे हजार

शांत समुद्र
पार वैतागला
निळ्याशार पाण्यावर
तवंग साचला

एकही जागा
उरली नाही
जेथे प्लास्टिक चा
शिरकाव नाही

पृथ्वी म्हणाली मानवांनो
जागे व्हा जरा
ह्या भस्मासुराला
नेस्तनाबूद करा
प्रत्येक वस्तू
प्लास्टिक च्या
वेसणात घालू नका
माझा अंत पाहू नका
Reduce Reuse Recycle
ची शपथ घ्या
Single use प्लास्टिक
बंद करा

माझ्या लेकरानो
हा भस्मासुर आहे खरा
कदाचित तिसरे महायुद्ध
आलय तुमच्या दारा...

No comments:

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...