Saturday, July 25, 2020

सुचणे

सुचतेच काही तरी
लिहायला गेलो तर...
कधी एक ओळ
शहाणी असते...
कधी वेडी
शहाणपणाच्या भरात
वाहावत जाणारी...
वेडेपणात
गटांगळ्या खाणारी... 

सुचायला असतात
शंभर विचार डोक्यात 
कधी उलटे
कधी सुलटे
कधी सरळ...
पानावर येतात
आपसूक तरंगत...

सुचले नाही तर काय?
शांत मिटून
पडून राहावे स्वस्थ
भावना येतात मग
घेऊन दस्तक...

सुचणे होऊन
जातो
शेवटी एक खेळ
विचार आणि भावनांचा
वर्तनातून होतो
कधी व्यक्त
नाहीतर निजलेल्या
चाफ्यात राहतो
अव्यक्त!

Think-feel-act
 

No comments:

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...