प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं
पाना फुलांनी ते कधी बहरतं
कधी शुष्क निष्पर्ण होऊन सुकतं
प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं
ऊर्जेचं खतपाणी दिलं की
सुंदर फुलांमधे ते हसतं
लक्ष न दिल्यास खुंटतं
प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं
आपणच ठरवायचं
निराशेच्या गर्ततेत त्याला लोटायचं
की हसऱ्या सुंदर मनाने त्याला फुलवायचं
प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं
जे आनंद देत, आनंद घेत उभं असतं
आणि त्याचं उभं असणं हेच सर्व काही असतं
प्रत्येकाच्या घरी एक आनंदाचं झाड असतं...
-आसावरी समीर
No comments:
Post a Comment