चित्रांची दुनिया
आहे मोठी सुंदर
पण व्याख्या चित्राची
आहे मोठी अवघड
शब्द काय?
चित्रांचे रूप
जुळवाजुळव मांडणी
आणि अद्भुत रूप
पाककला
चित्राची माया
आकार रंग चव
यांची किमया
संगीत म्हणजे
दुसरे चित्रच
सुर ताल लय संगतीत
व्हावे मस्त
शेवटी जीवन काय ?
आहे एक चित्र
रंगसंगती जमताच
व्हावे सुंदर!
No comments:
Post a Comment