Tuesday, April 7, 2020

दोन गोष्टी

Conversation-without-words



दोन गोष्टी
सांगायच्या असतात तुला
तू उगाच रागावशील
वाटत राहते मला
आणि दोन गोष्टी
विरूनच जातात
मनातल्या मनात

दोन गोष्टी
सांगायच्या नसतात तुला
दुखवयाचे नसते
तुझे मन
तरीही दोन गोष्टी
निसटूनच जातात शब्दात

दोन गोष्टी
सांगून टाकते तुला
शेवटी रुख रुख राहते
उगाच संगितले तुला
आणि दोन गोष्टी
घुसून राहतात
दोघांच्या मनात

दोन गोष्टी
आवर्जून सांगते तुला
हास्य उमलते
चार गालात
आणि दोन गोष्टी
घालतात बांध
मनामनात

दोन गोष्टी
काहीही न सांगता
जेव्हा समजतात तुला
तेव्हा वाटतो
एक विश्वास
आहेस तू माझा
आणखी काय हवे जीवनात...

No comments:

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...