आटपाट नगराची अजब कहाणी
एक था राजा आणि एक थी राणी
राजाचे राणीवर अफाट प्रेम
न बोलताही चाललाय खेळ
राणीचा राजावर रूसका राग
रागाच्या भरात जळलाय भात
राजा आणि राणी दोघेही व्यस्त
टाइम कहा है राहुया मस्त
राणी म्हणे राजाला गाऊ आपण गाणी
राजा म्हणाला वाहतय पाणी
राणीच्या आसवांची होते नदी
राजा ची बोट मध्ये उभी
राजा म्हणाला थांब ग राणी
तुझ्याच साठी भरतोय पाणी
राणीची आसवे पळून गेली
पावसाच्या पाण्यात चिंब बुडाली
No comments:
Post a Comment