गवताचं पातं
लवलवतं हिरवगार
दवाबिंदूचा एक कण
सामावून घेई हळुवार
गवताचं पातं
दृष्टीस भासे कधी शून्य
पुन्हा पाहता
कळे तोची अर्थपूर्ण
गवताचं पातं
उगवत राही तालात
सामावून घेई हिरवेपण
कणाकणात
गवताचं पातं
सृजनत्वाशी त्याचं नातं
धरणी मातेच्या उदरी
डोले हळूच गाणे गात
गवताचं पातं
शोधत जाई एक वाट
ही वाट ....
कधी दिसणारी
कधी चुकणारी
कधी थांबणारी
तर कधी सापडणारी...
गवताचं पातं
सापडलेल्या वाटेवर
उमलणारं
फुलणारं
बहरणारं
No comments:
Post a Comment