Friday, April 24, 2020

अश्रू


Rolling-tears


तुझ्यात आणि माझ्यात
अंतर आहे...
तुला त्रास होताच, दुःख होताच
तू व्यक्त होतेस...
कधी शब्दातून
कधी अश्रूतून

आणि मी मात्र
मनात ठेवतो
कायमच...
माझ्या व्यथा, माझे सल..
आतल्या आत घुसमटतो...
पण
झळकु देत नाही
दोन थेंब गालावर...

मला उमजत नाही.. 
अश्रू हे ढाळावेत
व्यथां बरोबर..
नकळत त्याची
होतील फुले
आणि भरून जाईल
तुझी
रिकामी ओंजळ...

No comments:

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...