Sunday, May 17, 2009

मला एक नवरा हवा..

मला एक नवरा हवा
पहाटेचा रम्य सुर्योदय
शांत सुन्दर संध्याकाळ्
सोबत् बघण्यासाठी

मला एक नवरा हवा
मी बनविलेली स्पेशल डिश
त्याच्यावर try करण्यासाठी
आणि प्रेमाचा घास
एकमेकाना भरविण्यसाठी


मला एक नवरा हवा
सुन्दर स्वप्ने सोबत बघण्यासाठी
हलकेच त्यामधे रंग भरुन
आयुष्य या मोठ्या स्वप्नामधे
न्हाऊन जाण्यासाठी

मला एक नवरा हवा
त्याचे टेन्शन्स दुर करण्यासाठी
त्याच्यावर खुप खुप्
प्रेम करण्यासाठी

मला एक नवरा हवा
हलकेच त्याच्या केसांवरुन
हात फिरवत
हळुच त्याच्या कुशीत सामाविण्यासाठी

मला एक नवरा हवा
लटकेच त्याच्यावर रागवुन
आंबट चिंबट भांडणांचा आस्वाद घेत
आयुष्य भराची साथ देण्यासाठी


मला एक नवरा हवा
पण मी त्याला शोधणार नाही
माझ्याही नकळत
तो हळुच माझ्या जवळ येइल
कधिही न दुर जाण्यासाठी..

3 comments:

Pradnya said...

cute one :)

Ganesh S said...

Tula aasa navara lavakar milo hich ishwar charani prathrana :)

दिपक जोशी, 9423932045 said...

आसावरी दिल्ली फार दूर नाहैी.

खूप आनंदी आहे आयुष्य

खूप आनंदी आहे आयुष्य  भरभरून जगले तर  सुख दुःखांच्या पार जाऊन  क्षणाक्षणांनी वेचले तर  खूप आनंदी आहे आयुष्य  टवटवीत ठेवले तर  भरल्या आभाळाकड...