माझे घर
वात्सल्याने भरलेले
मायेने ओथम्बलेले
आईच्या प्रेमाखाली
उभे असलेले
माझ्या घराला
नाहीत नुसत्या भिन्ती
अतुट रेशमाच्या धाग्यानी
विणली गेलेली नाती
माझ्या घरामधे
नाहि उणिव कशाची
ना सुखाची,ना समाधानाची
ना प्रेमाची,ना आपुलकिची
असे हे माझे घर
हिरव्या पानांमधे दडलेले
हसर्या फुलानी सजलेले
दुखातुन सहज सावरणारे
आनंदाच्या क्षणामधे रमणारे
अशा या घराची आठवण होता
मन हेलावते
आणि मनाची गाडी
पटकन घराकडे धाव घेते..
No comments:
Post a Comment