कळी उमलली
हळुच हसली
तिचे हास्य ते
कुणा उमगले
हास्यात त्या
होते सौंदर्य
ज्याला भावले
तो कविवर्य
कविमनाला ते
स्फुरण चढले
हास्यातून मग्
शब्द उमटले
शब्द ओठी
ह्र्दयी प्रीती
काय वर्णावी
त्या काव्याची महती
काव्यच ते
स्पर्शूनी गेले
तनामनाला
रंगवुनी गेले
No comments:
Post a Comment